सिंचन प्रकल्पातील पाणी तळाला

file photo
file photo

अमरावती : पावसाळ्यातील पहिला महिना जून कोरडा जात असताना पश्‍चिम विदर्भातील लघुप्रकल्प झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. तब्बल 258 प्रकल्पांतील जलसाठा संपला असून येत्या आठवड्याभरात दमदार पाऊस न झाल्यास पुन्हा पन्नासच्या जवळपास प्रकल्पांतील साठा संपण्याच्या बेतात आहे.


पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत 461 लघुप्रकल्प आहेत. ग्रामीण भागातील सिंचन व पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत असलेल्या या प्रकल्पांमध्ये गत हंगामात पुरेसा जलसाठा झाला नव्हता. यंदाचा उन्हाळा कडक गेल्याने पाण्याची मागणी वाढली व उपसा अधिक झाल्याने जलसाठ्यावर ताण वाढून साठा झपाट्याने संपुष्टात आला. पावसाळा लागला असला तरी मृगनक्षत्रात सरी बरसल्या नाहीत.

आर्द्राला प्रारंभ झाला असला तरी पावसाचा पत्ता नाही. मॉन्सूनची हुलकावणी कायम आहे. वेळापत्रक निश्‍चित होत नसल्याने प्रकल्पांवरील ताण वाढला आहे. मृत साठ्यावर तहान भागविण्याची वेळ आली असताना तब्बल अर्धे लघुप्रकल्प कोरडेठण्ण पडलेत. कोल्हापुरी बंधारे, उपसा सिंचनमधील पाणी आटले आहे.


वाशीम जिल्हा लघुप्रकल्पांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील 105 प्रकल्पांतील जलसाठा संपला आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ सोसणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील 65, अमरावतीमधील 37, अकोल्यातील 33 व यवतमाळमधील 18 प्रकल्पांतील साठा संपला.

विभागात उरलेल्या 203 प्रकल्पांत सद्यस्थितीत केवळ 5 दलघमी साठा शिल्लक आहे. या सप्ताहात पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न बरसल्यास यातील पन्नासवर प्रकल्पांतील साठा संपण्याच्या स्थितीत आहे.


यंदा मॉन्सूनचे वेळापत्रक अद्याप स्थिर झालेले नाही. सरलेला उन्हाळा अतितापमानाचा होता व टंचाईने भीषण रूप धारण केले होते. टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढल्याने टॅंकरची संख्या वाढली. विभागातील 418 गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. यंदा सरासरी इतका पाऊस न झाल्यास व पाणलोट क्षेत्रात दमदार सरी न बरसल्यास आगामी वर्षात टंचाईची स्थिती आणखी भयंकर होण्याची शक्‍यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com