जे. पी. नड्डा आज नागपुरात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 September 2019

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर जगत प्रसाद नड्डा प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने, पक्षातर्फे त्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याबाबत प्रदेश प्रवक्‍ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

ते म्हणाले, बुधवारी (ता. 18) राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचे सकाळी साडेअकराला नागपुरात आगमन होईल. त्यांच्या स्वागतासाठी भाजपतर्फे दुपारी साडेबाराला स्कूटर रॅली काढण्यात येईल. रॅली वर्धा रोड येथून दीक्षाभूमी येथे येईल. त्यानंतर भाजप महामंत्री संदीप जोशी यांनी सुरू केलेल्या मेडिकल कॉलेज येथील दीनदयाल थालीच्या उपक्रमाला भेट देईल. दुपारी दोनला सुरेश भट सभागृहात भाजप लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संकल्प रॅली होईल. संकल्प रॅलीला भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संबोधित करतील. यात संघटन महामंत्री सतीश, प्रदेश संघटन महामंत्री विजय पुराणिक, आमदार अशोक नेते, रामदास तडस, संजय धोत्रे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रणजित पाटील, राज्यमंत्री संजय कुटे, आदिवासीमंत्री अशोक उईके आदी सहभाग नोंदवतील. संकल्प रॅलीनंतर दुपारी साडेतीनला राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत. सायंकाळी पाचला रेशीमबाग स्मृती मंदिर येथील समाधिस्थळी भेट दिल्यानंतर ते दिल्लीला रवाना होतील.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: j p nadda visit nagpur