नाट्यवेडा जगदीश कामावर गेला, मग अचानक झाला बेपत्ता...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांनी विहिरीतून प्रेत बाहेर काढले. चंद्रपुरातुन बेपत्ता झालेल्या येथील माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश डोंगरवार यांचे प्रेत असल्याची खात्री पटली, तेव्हा गावात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी मृतकाचे प्रेत येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले .
नाट्यवेड्या, नाट्यरसिक जगदीश डोंगरवार यांच्या दुर्दैवी मृत्यूने नवेगावबांधवासी हळहळले.

नवेगावबांध - येथील प्रभाग क्रमांक दोन मधील माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश गोपाळा डोंगरवार (वय 40 वर्षे) यांचे प्रेत एका विहिरीत सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
मृतक जगदीश हे बुधवार दिनांक 11 मार्च बुधवारपासून चंद्रपुरातून बेपत्ता झाले होते.
येथील माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश गोपाळा डोंगरवार हे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर येथील झेप व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरु होते. गेल्या महिन्याभरापासून ते या केंद्रात उपचार घेत होते. उपचार घेत असताना प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या परिसरातील एका भांड्यांच्या दुकानात ते कामही करायचे. नेहमीप्रमाणे बुधवार दिनांक 11 मार्चला सकाळी 10.00 वाजता जगदीश कामावर गेले. परंतु नेहमीच्या वेळेवर ते व्यसनमुक्ती केंद्रात रात्री पोहोचले नाही. तेव्हा झेप व्यसनमुक्ती केंद्र चंद्रपूर येथून नवेगाव बांध येथील त्यांच्या कुटुंबीयांना गुरुवार दिनांक 12 मार्चला जगदीश बेपत्ता असल्याचे कळविले. जगदीश घरी परतलाच नव्हता. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. तेव्हा मृतक जगदीश यांची पत्नी केशर जगदीश डोंगरवार यांनी आपल्या वडिलांसोबत चंद्रपूरला जाऊन शनिवार 14 मार्चला शहर पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे जगदीश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली व त्या 14 मार्चला रात्री नवेगावबांध येथे घरी परतल्या.
आज दिनांक 15 मार्च रोजी रविवारी माऊली मोहल्ल्यातील एक महिला पाणी भरण्यासाठी सकाळी 6.30 ते 7.00 दरम्यान विहिरीवर गेली असता, विहिरीत एक प्रेत तरंगत असल्याचे तिला दिसले. याची माहिती तिने शेजारी-पाजारी दिली. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष महादेव बोरकर यांनी पोलिस स्टेशन नवेगावबांध येथे याबाबत माहिती दिली. तेव्हा हवालदार साईनाथ नाकाडे, दीपक कराड ,सुभाष कश्‍यप,राजीराम मेश्राम ,वाहन चालक सयाम हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बघ्यांची एकच गर्दी घटनास्थळावर झाली होती.
नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांनी विहिरीतून प्रेत बाहेर काढले. चंद्रपुरातुन बेपत्ता झालेल्या येथील माऊली मोहल्ल्यातील रहिवासी जगदीश डोंगरवार यांचे प्रेत असल्याची खात्री पटली, तेव्हा गावात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी मृतकाचे प्रेत येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले .
नाट्यवेड्या, नाट्यरसिक जगदीश डोंगरवार यांच्या दुर्दैवी मृत्यूने नवेगावबांधवासी हळहळले.
बुधवारी सायंकाळी जगदीशला सौंदड येथे काही लोकांनी पाहिल्याचे समजते. तसेच गुरुवारी देवलगाव रेल्वे स्टेशनवर जगदीशला काहींनी पाहिल्याचे कळते. परंतु जगदीश या दोन्ही दिवशी घरी मात्र आला नाही. असे त्यांच्या पत्नी केशर व शेजारी महिलांनी देखील सांगितले. मृतक जगदीशचे आई, वडील व मुले लग्नानिमित्ताने बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्या पत्नी केशर ह्या एकट्याच घरी होत्या.
मृतक जगदीशची पत्नी केशर यांच्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद केली आहे. जगदीशने आत्महत्या केली की काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
उत्तरीय तपासणी नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार संस्कार स्थानिक स्मशान घाटावर करण्यात आले.
त्यांच्या मागे पत्नी केशर, दोन मुले हर्षद, ज्ञानेश्वर, वडील गोपाळा, आई सखुबाई व भाऊ रमेश असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
नवेगावबांध पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साईनाथ नाकाडे पुढील तपास करीत आहेत.

 सविस्तर वाचा - बहिणीची भेट घेऊन परतले आणि बसला धक्‍का

नाट्यवेडा जगदीश
मृतक जगदीश डोंगरवारचे वडील गोपाळा डोंगरवार हे येथील श्रीकृष्ण प्रासादिक नाट्य मंडळाचे व्यवस्थापक आहेत. बालपणापासूनच वडिलांच्या नाटकाशी असलेल्या संबंधामुळे जगदीशलाही नाटकाचे वेड लागले. नाटकाच्या आयोजनात त्याचा सिंहाचा वाटा असे. अनेक नाट्यप्रयोगाचे त्यांनी आयोजन केले होते.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jagdish commit suscide but why?