

Buldhana Crime
sakal
जळगाव जामोद : अपघाताचा बनाव रचून पतीने पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. पत्नीच्या हत्येसाठी चक्क पतीने मित्राच्या मदतीने कार चालकाला एक लाख रूपयांची सुपारी दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह तिघांना अटक केली आहे.