आता मी आई कुणास म्हणू... वाचलेल्या सहा वर्षीय जान्हवीचा टाहो

02.jpg
02.jpg

अकोला ः घरात कोणी नसल्याचे पाहून एका विवाहितेने स्वतःच्या दोन वर्षीय मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून जीवे मारले. नंतर स्वतःही जाळून घेत आत्महत्या केली. मात्र, यावेळी दुसरी सहा वर्षीय जान्हवी नामक चिमुकली शेजारी खेळायला गेली होती. घटनेनंतर शेजारील नागरिकांनी पोलिसांना फोन करीत मुलीचा आणि तिच्या आईचा मृतदेह घराबाहेर काढला. मात्र, आईचा मृतदेह पाहून जान्हवीने आई...म्हणत हंबरडा फोडला.‘ जान्हवीचे पानावलेले डोळे, उपस्थिताना न्याहाळत होते, आता मी आई कुणास म्हणू अशीच अवस्था तिची यावेळी झाली होती. जान्हवीचा केविलवाणा चेहरा पाहून यावेळी उपस्थितांचे डोळेही पाणावले होते. ही ऱ्हदयद्रावक घटना डाबकी रोड पोलिस ठाण्यांतर्गंत येणाऱ्या गजानन महाराज गल्ली क्रमांक दोनमध्ये बुधवारी (ता.22) दुपारी दीड वाजता घडली.

डाबकी रोड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोरोबाकाका मंदिर परिसरात राहणाऱ्या रुपाली इंगोले (वय 26) नामक विवाहितेने घरात कोणी नसल्याचे हेरत स्वतःच्या आनंदी नावाच्या दोन वर्षीय चिमुकलीला पाण्याच्या टाकीत बुडवून जीवे मारले. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पंख्याला बांधलेला दोर तुटल्याने गळफास घेण्याचा बेत फिस्कटलेल्या महिलेने अंगावर राॅकेल ओतून जाळून घेत आत्महत्या केली. यावेळी घरातून किंकाळण्याचा आवाज आल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत घराचा दरवाजा तोडला. त्यानंतर घरातील पाण्याच्या टाकीत आनंदी बुडालेली दिसून आली तर रुपाली जळालेल्या अवस्थेत होती.

कृत्याचे गूढ कायम
मृतक रुपालीचा पती गिरीधर हे गव्हाला पाणी देण्यासाठी पंधरा दिवसांपासून बाहेरगावी असल्याचे माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. दोघां पती-पत्नीमध्ये कुठलाच वाद नव्हता. त्यानंतरही रुपालीने एवढे टोकाचे पाऊल का उचलले असावे याची चर्चा आहे. याबाबत डाबकी रोड पोलिस तपास करीत आहेत.

जान्हवीवर कोसळले एकाकी संकट
आईने जाळून घेत स्वतःला संपवून टाकले तर पाठच्या बहिणीला जीवे मारले. शेजारी खेळायला गेली म्हणून वाचलेल्या जान्हवीवर एकाकी कोसळलेले संकटाची तिला समज जरी नसली तरी आईचे हरविलेले छत्र आणि पाठच्या बहिणीच्या एकाकी जाण्याने सहा वर्षीय जान्हवी आजीच्या कुशीत बसून रडत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com