मूर्तिजापूरच्या जया व निकिता बनल्या न्यायाधीश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vakil

मूर्तिजापूरच्या जया व निकिता बनल्या न्यायाधीश

मूर्तिजापूर : स्थानिक ॲड. जया किशोरी चैनाणी व ॲड. निकिता जयवंत पाचडे या दोघी दिवाणी न्यायधीश (कनिष्ठ स्तर) 2019 परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या तालुक्यामधून एकूण तीन मुली आहेत. त्यामुळे कमी वयात महिला न्यायाधीश होण्याचा मान त्यांनी पटकावला आहे. तालुक्यामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केल्या जात आहे.

हेही वाचा - 2020 मध्ये सुट्यांची बौछार, तब्बल तीन

सेंट आंन्स स्कूलमधून दहावीत 80 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या जयाने बारावीचे शिक्षण गाडगे महारज विज्ञान महाविद्यायामधून पूर्ण केले. त्यानंतर डॉ. आर. जी. राठोड या महाविद्यालयामधून बी. एस. सी. कॉम्प्युटरच्या डीग्रीमध्ये 69 टक्के घेऊन उत्तीर्ण झाली. तालुक्यात विधी महाविद्यालय नसल्याने अकोला येथील नथमल गोयनका विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणि त्यामध्ये 65 टक्के घेऊन उत्तीर्ण झाली. अकोला येथील ॲड. बी. के. गांधी यांच्या मार्गदर्शनात न्यायालयात सराव चालू केला. 

वडिलांची इच्छा होती न्यायाधीश व्हावं
जयानं न्यायाधीश व्हावं अशी सुरुवातीपासूनच तिच्या वडिलांची इच्छा होती. दिवसामधून सतत 7 तास अभ्यास करून लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रामधून 13 वी रँक मिळवुन यश संपादन करून न्यायाधीश होण्याचा मान मिळविला. आणि आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. यासाठी प्रा. गणेश सिरसाट यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. जया आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देते.
 
निकिताने आपले शालेय शिक्षण स्थानिक श्री व्यंकटेश बालाजी हायस्कूलमध्ये घेतले. अमरावती येथील विद्याभारती विद्यालयामधून व्होकेशनल सायन्स इलेक्ट्रॉनीक विषयात शिक्षण पूर्ण केले. वयाच्या 12 व्या वर्षापासून कायद्याविषयक अभ्यासाचे धडे घेतले. विधीचे शिक्षण अमरावती यथील डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालयामधून पूर्ण करून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमधून प्रथम मेरिट येण्याचा बहुमान मिळविला.

येथे क्लिक करा - फक्त देवेंद्र फडणवीसच लक्ष का? चंद्रकांत पाटील


अनेक बक्षिसांची मानकरी 
विधी शिक्षणा दरम्यान, विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय गुट कोर्ट व गुट डायल स्पर्धेत, राज्यस्तरीय पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये सहभाग घेऊन बेस्ट ॲडव्होकेट, बेस्ट लेडी ॲडव्होकेटचे बक्षीसं मिळविली. त्याचप्रमाणे बेस्ट प्रेझेंडेशन ट्रॉफी मिळविण्याचा मान देखील निकिताने मिळविला.


 

loading image
go to top