esakal | काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार का? जयंत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले... 
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant patil make big statment about deputy CM post in Maharashtra

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकरणकर, निरीक्षक किशोर माथनकर, माजी आमदार संदीप बाजोरीया उपस्थित होते. पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी करताना सर्वच विषयांवर चर्चा झाली आहे

काँग्रेसचा उपमुख्यमंत्री होणार का? जयंत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले... 

sakal_logo
By
राजकुमार भितकर

यवतमाळ  : महाविकास आघाडी स्थापन करताना पदवाटपाबाबत तिन्ही पक्षांची सखोल चर्चा झालेली आहे. उपमुख्यमंत्री पदाचाही त्यात समावेश होता. काँग्रेसकडून अद्याप तशी मागणी आलेली नाही. विधानसभा अध्यक्षपद मोकळे झाले असून, त्यावर चर्चा होईल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त यवतमाळला आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा - आता प्रदेशाध्यक्षपदही विदर्भालाच, काँग्रेसचा 'हात' विदर्भाच्याच डोक्यावर का...

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकरणकर, निरीक्षक किशोर माथनकर, माजी आमदार संदीप बाजोरीया उपस्थित होते. पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी करताना सर्वच विषयांवर चर्चा झाली आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे गेले होते. सध्या विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले. त्यामुळे त्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील. भाजपच्या काळात राज्याची आर्थिकस्थिती अडचणीची झाली आहे. अनेक हजार कोटी थकले आहेत. कोरोनाच्या काळातील वीजबिलाचा मुद्दा आहे. त्यासंदर्भात ऊर्जामंत्री योग्य निर्णय घेतील. थकबाकीमुळे महावितरणची स्थिती अडचणीची झाली आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही पाटील म्हणाले

मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी सुरू होत आहे. त्यात राज्य सरकारने आपली भूमिका मांडली आहे. कोणत्याही समाजाचे हक्काचे आरक्षण शासन कमी करणार नसल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा - मुला-मुलीचं लग्नही पाहता आलं नाही; पोट भरण्यासाठी...

अन्नदात्याला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न

दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन दोन महिन्यांपासून सुरू आहे. शेतकरी आत येऊ नयेत म्हणून त्यांच्या मार्गावर खिळे ठोकले जात आहेत. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. एवढीच सुरक्षा पाकिस्तान व चीनच्या सीमेवर केली असती, तर देश आणखी सुरक्षित झाला असता. केंद्र शासन ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, ते अत्यंत चुकीचे असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image