जिपचा भीषण अपघात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

खामगाव (जिल्हा बुलडाणा) : पुणे येथून परतत असताना जिपला भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात खामगाव येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे हे सुखरुप बचावले आहेत. ही घटना दुपारी १२ वाजताच्‍या सुमारास घडली. 

खामगाव (जिल्हा बुलडाणा) : पुणे येथून परतत असताना जिपला भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात खामगाव येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे हे सुखरुप बचावले आहेत. ही घटना दुपारी १२ वाजताच्‍या सुमारास घडली. 

डॉ.निलेश टापरे यांना किरकोळ स्‍वरुपाची ईजा झाली असून पुणे येथे औषधोपचार झाल्‍यावर गुरुवारी सुटी देण्यात येईल. डॉ. निलेश टापरे हे एका महाविद्यालयीन कार्यक्रमासाठी पुणे येथे गेले होते. मंगळवारी पुण्याहून खामगावकडे परत येत असतांना  त्‍यांची जिप क्रमांक एमएच 28 एझेड 3447 अचानक झाडावर आदळली. यात जिपच्‍या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने डॉ.टापरे यांना गंभीर ईजा झाली नाही. त्‍यांच्‍यावर पुणे येथे खाजगी हॉस्‍पीटलमध्ये उपचार करण्यात आले. दरम्‍यान सकाळने डॉ.टापरे यांच्‍याशी संपर्क करुन त्‍यांच्‍या प्रकृतीविषयी जाणून घेतले असता काळजीचे कोणतेही कारण नाही, माझी तब्‍बेत आता ठिक आहे असे त्‍यांनी सांगितले. 

दैव आड आले
जिपचा अपघात भीषण होता. अपघातानंतर जिपची स्‍थिती पाहल्‍यावर ही भीषणता जाणवत होती. मात्र सिटबेल्‍ट लावलेला असल्‍याने तसेच वेळीच एअरबॅग उघडल्‍याने डॉ. टापरे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. चांगली कामे केली की, संकटकाळी दैव आड याचा प्रत्‍यय या अपघाताच्‍या निमित्‍ताने आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jeep accident