esakal | औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली जीवतीची भाजी झालीय दुर्मीळ
sakal

बोलून बातमी शोधा

jivati

रान वनस्पतींचे शास्त्रीय नाव टेलोस्मा पॅलिडा आहे. तीन मीटरपर्यंत उंची असलेली ही वनस्पती गुळगुळीत असते. या वनस्पतीचा उपयोग डांग्या खोकला, सर्दी आणि दम्याचा उपचार करण्यासाठी केला जातो. फळांमधून मिळविलेले दुधाळ लेटेकस ल्युकोडर्मा आणि इतर त्वचेच्या रोगांमध्ये वापरले जाते.

औषधी गुणांनी परिपूर्ण असलेली जीवतीची भाजी झालीय दुर्मीळ

sakal_logo
By
गजेंद्र मंडलिक

अंजनगावसुर्जी (अमरावती) : सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या अंजनगावसुर्जी परिसरामध्ये दरवर्षी पावसाळ्यात बाजारामध्ये जीवतीची रानभाजी विकायला येत असते. जी खूप कमी प्रमाणात उपलब्ध असते. याच्या फुलांची भाजी चविष्ट व पौष्टिक आहे. धार्मिक तसेच आरोग्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त असल्याने त्याची चांगलीच मागणी आहे. या वनस्पतीचे धार्मिक महत्त्वही आहे. एका प्राध्यापकांनी या भाजीवर बाजारात सर्वेक्षण केले असून अशाप्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड केल्यास त्याचा शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना लाभ होऊ शकतो, असा निष्कर्ष काढला आहे.

या रान वनस्पतींचे शास्त्रीय नाव टेलोस्मा पॅलिडा आहे. तीन मीटरपर्यंत उंची असलेली ही वनस्पती गुळगुळीत असते. या वनस्पतीचा उपयोग डांग्या खोकला, सर्दी आणि दम्याचा उपचार करण्यासाठी केला जातो. फळांमधून मिळविलेले दुधाळ लेटेकस ल्युकोडर्मा आणि इतर त्वचेच्या रोगांमध्ये वापरले जाते. या वनस्पतीची फुले दरवर्षी पावसाळ्यात अंजनगावसुर्जी बाजारामध्ये विकायला येत असतात. त्याच्या फुलांची भाजी या परिसरातील लोक खातात.

या जीवतीच्या वेलीला धार्मिक महत्त्व आहे. त्याचे नाव त्या प्रथेच्या आधारावरच दिल्या गेले आहे. धार्मिक प्रथेनुसार जीवती ही देवता लेकुरवाळी बाई असून तिची पूजा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये श्रावणातील शुक्रवारी केली जाते. तिच्या पूजेसाठी आणि नैवेद्य म्हणून त्या वेलीच्या फुलांची भाजी करून ठेवतात. त्याच कारणामुळे त्याला जीवती असे नाव या भागामध्ये देण्यात आले आहे.

राधाबाई सारडा महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगेश डगवाल यांनी बाजारामध्ये सर्वेक्षण केले असता असे लक्षात आले की त्याचे प्रमाण खूप कमी असते, ती महागसुद्धा असते. अशाप्रकारच्या औषधी वनस्पतीची लागवड केल्यास त्याचे प्रमाण वाढून शेतकऱ्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्नाचा आधार होऊ शकतो व सामान्य जनतेला आरोग्यदायी व पौष्टिक रानभाजी मिळू शकते.

सविस्तर वाचा - ब्रेकिंग : ज्योतिरादित्य सिंधियांनी घेतले स्मृती मंदिरात दर्शन; सिंधिया पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर

धार्मिकतेसह आरोग्यदायी महत्त्व
वनस्पतिशास्त्रात अभ्यासानुसार या भूमंडलात अनेक औषधी वनस्पती आपल्या सभोवताली आहेत. त्यातीलच जीवती ही एका विशिष्ट काळात येणारी वनस्पती आहे. ही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून श्रावणमासात तिला पूजनाचे धार्मिक महत्त्वसुद्धा आहे. शेतकऱ्यांनी या वनस्पतीची लागवड करून तिच्या उत्पादनाचा विस्तार व्हावा, असे येथील सारडा महाविद्यालयाचे वनस्पतिशास्त्रप्रमुख डॉ. मंगेश डगवाल यांनी सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top