- अविनाश साबापुरे
यवतमाळ - यापूर्वीच्या युती सरकारने ७२ हजार जागांवर मेगाभरतीची घोषणा केली होती. मात्र अजूनही महाराष्ट्रातील नोकऱ्यांचा दुष्काळ संपलेला नसून उलट तो मेगाभरतीच्या आकड्यापेक्षाही अधिक मोठा असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण आता सामाजिक न्याय विभागाने २१९ जागांची भरती सुरू करताच तब्बल पावणे दोन लाखांवर बेरोजगारांनी अर्ज केलेत.