कन्हान पुलावरून उडी मारून प्रेयसीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

खापरखेडा (जि.नागपूर) : साहोली- पारशिवनी टी पॉइंट मार्गावरील कन्हान नदीच्या पुलावरून उडी मारून एका प्रेयसीने गुरुवारी (ता. 5) सायंकाळी चारच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रियकराच्या डोळ्यादेखतच प्रेयसीने उडी मारली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

खापरखेडा (जि.नागपूर) : साहोली- पारशिवनी टी पॉइंट मार्गावरील कन्हान नदीच्या पुलावरून उडी मारून एका प्रेयसीने गुरुवारी (ता. 5) सायंकाळी चारच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रियकराच्या डोळ्यादेखतच प्रेयसीने उडी मारली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, पूजा भानुदास साहू (वय 19, नवीन भानेगाव) असे आत्महत्या केलेल्या प्रेयसीचे नाव आहे. सदोक चंदू खरोले (वय 22, नवीन भानेगाव) असे प्रियकराचे नाव आहे. हे दोघेही एकाच मोहल्ल्यात राहत असून या दोघांचेही मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. प्रेमप्रकरण दोघांच्याही घरी माहिती असल्याचे सूत्रांनुसार कळते. प्रेयसी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरून निघाली. दरम्यान, प्रियकराने तिला भानेगाव रेल्वे क्रॉसिंगजवळून दुचाकीवर बसवून त्याला नागपूरला कॉलेजला काम असल्याचे सांगून दोघेही कोराडीपर्यंत गेले. प्रियकराचे प्रेयसीवर संशय घेत भांडण झाले. तिला कोराडीवरून परत समजावत पारशिवनीमार्गे सिंगोरीजवळ आणले. ती शांत झाल्यानंतर घरी परत जायला निघाले. पारशिवनी पुलाजवळ येताच प्रेयसीने आधारकार्ड पडल्याचा बहाणा करीत गाडी थांबवायला लावली. अचानक याचवेळी प्रियकराला कुणाचा तरी फोन आल्यामुळे फोनवर बोलत होता. प्रेयसीने गाडीवरून उतरताच नदीत उडी मारली. प्रियकर तिच्याकडे धावला; मात्र तिने उडी घेतली. तो तिला वाचवू शकला नाही. मार्ग वर्दळीचा असल्याने बघ्यांची गर्दी जमली. गावात घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली. घटनास्थळावर प्रियकराची दुचाकी व गाडीवर प्रेयसीची बॅग व चप्पल आढळून आली. खापरखेडा पोलिसांना माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले. त्याला पारशिवनी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलिस मृतदेहाच्या शोधात
प्रेयसी बीएला शिकत होती; तर प्रियकर केडीके कॉलेजला इंजिनिअरिंग करीत होता. त्यांचे मागील तीन वर्षांपासून सूत जुळले होते. दोघांच्याही घरी प्रेम प्रकरण माहिती होते. कन्हान नदीला पूर असल्यामुळे मृत युवतीचा मृतदेह वाहत गेला. तिला शोधण्यासाठी बिना संगम भागात पारशिवनी पोलिसांनी चमू पाचारण केली. रेस्क्‍यू टीमसाठी 48 तासांचा कालावधी लागत असल्याने पारशिवनी पोलिसांनी तहसीलदार यांना पत्र दिले.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jumps over the bridge The suicide of a maroon lover