महाराष्ट्र वन वणव्यात आघाडीवर!

राजेश रामपूरकर
मंगळवार, 28 मे 2019

नागपूर : अंबाझरी वनक्षेत्रात लागलेल्या आगीच्या निमित्ताने देशात लागणाऱ्या वणव्यांमध्ये सर्वाधिक वणवे महाराष्ट्रात लागत असल्याची बाब पुढे आली आहे. केंद्रीय वने आणि सर्वेक्षण संस्थेने गेल्यावर्षी केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च 2018 या कालावधीत देशात 22 हजार 128 ठिकाणी आगी लागल्या होत्या. त्यात सर्वाधिक 1023 आगीच्या घटना महाराष्ट्रात होत्या. त्या तुलनेत यंदा या तीन महिन्यांत 4027 आगी लागल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहेत.

महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेश तर तिसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड आहे. राज्यातील सर्वाधिक आगी नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात लागल्या आहेत. राज्यातील विविध जंगलांमधील गेल्या तीन महिन्यांत 4027 वन वणवे लागले असून त्यात 16 हजार 815 हेक्‍टर जंगल जळाले आहे. त्याची टक्केवारी 0.27 आहे. सर्वाधिक गडचिरोली जिल्ह्यात 1292 आगी लागल्यात. त्यात 6469 हेक्‍टर जंगल खाक आहे. त्यापाठोपाठ 113 आगी नागपूरच्या जंगलाला लागली आहे. त्यात 2484 हेक्‍टर जंगल जळाले. उपग्रहाद्वारे जंगलामध्ये लागलेल्या आगी आणि शेतजमिनीवरील आगींचा समावेश असतो. एसएमएसच्या साहाय्याने वनविभागाला प्राप्त झालेल्या माहितीची वन कर्मचारी त्या परिसराची पडताळणी करतो. त्यानंतर ते क्षेत्र जंगलाचे आहे की शेतीचे, हे निश्‍चित होते. त्यामुळे भारतीय वन सर्वेक्षण विभागाकडून आलेले सर्वच एसएसएसचे अलर्ट जंगल जळाल्याचे नसते. त्यातील फक्त 40 टक्केच जमीन जंगलाचे असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
तापमानात होणाऱ्या वाढीबरोबर आगींच्या संख्येतही वाढ होत असते. जंगलात लागणाऱ्या वणव्यांखेरीज तेंदूपत्ता आणि मोहाचे संकलन, शेतीच्या कामासाठी लावल्या जाणाऱ्या आगी, माणसांनी लावलेल्या आगी अशा सर्व घटनांचा समावेश असतो. उन्हाळ्यातील कोरडे तापमान आणि जोरात वाहणारे वारे यामुळे जंगलांमध्ये आगी पसरण्याचे प्रमाणही मोठे असते.
विदर्भात सर्वाधिक आगी या गडचिरोलीत लागल्या आहेत. त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वांत कमी आग नाशिक वनवृत्तात लागली आहे.
जंगलांना वणव्यांचा धोका
मानवनिर्मित आगीचे प्रमाण 85 टक्के
जंगलातील 15 टक्के वणव्यांचे कारण नैसर्गिक
वणवे पेटविणाऱ्यावर शोध घेऊन कारवाई करणे अपेक्षित
वनक्षेत्रात मनुष्यबळ अपुरे असल्याचा लोक घेतात गैरफायदा
आग विझविण्यासाठी अपुरी साधने
दुर्मिळ कीटक, पक्षी, प्राण्यांचा होरपळून मृत्यू
तापमानात भर आणि भूजलपातळीत घट
हवा, माती आणि पाण्याच्या प्रदूषणात वाढ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jungle file news