Electric Shock : कुलरचा शॉक लागून लिपिकाचा जीव गमावला; नरखेडात दुर्दैवी घटना
Cooler Accident : नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील कनिष्ठ लिपिक मनोज रामभाऊ कपले यांचा कुलरमध्ये पाणी भरताना शॉक लागून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली असून गावात शोक व्यक्त केला जात आहे.
जलालखेडा : कुलरमध्ये पाणी टाकताना शॉक लागून कनिष्ठ लिपिकाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (ता.१२) सकाळी सातच्या सुमारास नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथे घडली.