Indian Army : विवाहाच्या तिसऱ्याच दिवशी गणेश गेला देश सेवेवर, संसारापेक्षा कर्तव्याला दिले महत्व

Newly Married Soldier : बाळसमुद्रचे जवान गणेश भंडारे लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी देशसेवेच्या कर्तव्यासाठी जम्मू सीमेवर रवाना झाले, त्यांच्या देशप्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Indian Army
Indian ArmySakal
Updated on

सिंदखेड राजा : सैन्यात कार्यरत असलेला तालुक्यातील बाळसमुद्र येथील गणेश गजानन भंडारे हा स्वतःच्या लग्नासाठी सुटीवर गावी आला होता. परंतु, भारत व पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना विवाहाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी कर्तव्यावर परतावे लागले आहे. बाळसमुद्र येथील गणेश गजानन भंडारे हा युवक जम्मू भागातील आखनुर येथे सैन्य सेवेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com