जरा थांबा, आयुक्त आल्यावरच सुटतील समस्या!

akola
akola
Updated on

अकोला : महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दररोज येत असलेल्या तक्रारींचा खच महापालिकेच्या विविध विभागात व झोन कार्यालयात पडून आहेत. त्यावर निर्णय घेवून ती समस्या सोडविण्यासाठी वर्ष-वर्ष उलटतात. मात्र तीच समस्या महापालिका आयुक्त प्रभागात पोहोचताच काही तासात निकाली काढली जाते. त्यामुळे आता नागरिकांना समस्या सुटण्यासाठी आयुक्तांनी त्यांच्या प्रभागात पोहचेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येते. ‘आयुक्त आपल्या प्रभागात’ या मोहिमेने महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचीच पोलखोल केली.


महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मनपा अंतर्गत पुरविण्‍यात येणाऱ्या मुलभुत सोई-सुविधांच्‍या तक्रारी जलद गतीने निपटारा करण्‍याच्‍या उद्देशाने तसेच शहरातील नागरिकांच्‍या अनेक दिवसंपासून मुलभुत सोई-सुविधांशी संबंधीत प्रलंबित तक्रारींचा निपटारा प्राधान्‍याने क्षेत्रीय स्‍तरावरच करण्‍याबाबत प्रशासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आयुक्‍त आपल्‍या प्रभागात’ या मोहिमेचा गुरुवारी दुसरा दिवस होतो. आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह मनपाचा ताफा गुरुवारी सकाळीच प्रभाग क्रं.8 मध्‍ये पोहोचल्यानंतर नागरिकांनी त्यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. आयुक्तांनी रघुवीर नगर, अयोध्‍या नगर व कॅनॉल रोडवरील परिसराची पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्‍यांच्‍या समस्‍या ऐकून घेतल्‍या. सर्विस गल्‍लीमधिल अतिक्रमणे काढणे, पिण्‍याच्‍या पाण्याच्या जलवाहिनीचे लिकेज दुरूस्‍त करणे, परिसरातील दैनंदिन स्‍वच्‍छता करणे, पथदिप दिवसा सुरू असणे तसेच सांडपाणी वाहून जाण्‍याकरिता पुरेशा नाल्‍या बांधण्‍यात आलेल्‍या नाहीत व जे बांधण्‍यात आलेल्‍या नाल्‍या आहेत त्‍यांना व्‍यवस्थितरित्‍या उतार दिल्‍या नसल्‍याने सांडपाणी पूर्ण नाल्‍यामध्‍ये साचत राहते व त्‍यामुळे संपूर्ण परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढलेला असून, नाल्‍यांची व नालीची व्‍यवस्‍था करून देणे, नळ कनेक्‍शन देण्‍यासाठी बऱ्याच ठिकाणी खड्डे खोदून तसेच ठेवण्‍यात आलेले आहेत त्‍यांना बुझवून देणे आदीबाबत नागरिकांनी मनपा आयुक्‍त यांच्‍याकडे तक्रार दिली आहे. यावेळी मनपा उपायुक्‍त श्रीमती रंजना गगे, नगरसेवक सुनील क्षीरसागर, तुषार भिरड, नगरसेविका नंदाताई पाटील, रंजनाताई विंचनकर, नगरसचिव अनिल बिडवे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.


तत्काळी दुरुस्ती
नागरिकांनी रस्त्यावर येत असलेले सांड पाणी आणि जलवाहिनी फुटल्याचा प्रकार आयुक्तांच्या लक्षात आणून दिला. त्यावर आयुक्तांनी जलप्रदाय विभागासह संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत तत्काळी दुरुस्तीबाबत आदेश दिले. त्यानंतर काही तासातच फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली आणि खोदून ठेवलेला खड्डा बुजवला.


आठवडाभरात अहवाल
मनपा आयुक्‍त यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर पथदिप टाईमरवर टाकण्याची सूचना दिली. तसेच अभियंत्‍यांनी एका आठवड्यात संपूर्ण भागाचा सर्व्हे करून सांडपाणी निकासी बाबत नकाशा तयार करून अहवाल सादर करणाचा आदेश दिला.


नागरिकांना सहकार्याचे आवाहन
नागरिकांशी संवाद साधतांना कोणतेही सार्वजनिक काम हे लोकसहभागाशिवाय शक्‍य नसते म्‍हणून नागरिकांनी सहकार्य करण्‍याचे आवाहन मनपा आयुक्‍त यांनी यावेळी केले. नागरिकांनी आपल्‍या घरात व प्रतिष्‍ठानात निघणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून परिसरात न टाकता फक्‍त मनपाच्‍या कचरा घंटा गाडीमध्‍ये टाकावेत व आपल्‍या घराचा बांधकाम नकाशाची पाहणी करून आपले अतिक्रमणे स्‍वतः काढून प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती मनपा आयुक्‍त यांनी यावेळी केली.


दंडात्मक कारवाई
आयुक्तांच्या पाहणीत परिसरातील खुल्‍या भुखंडावर शेण टाकले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर ते उचलून घेण्‍यात आले. सर्विस गल्‍लीमध्‍ये बांधकाम साहित्‍य ठेवल्‍यामुळे एकनाथ निमकंडे यांच्‍यावर 2 हजार रुपयांची दंडात्‍मक कारवाई आरोग्‍य विभागाच्‍या वतीने करण्‍यात आली. याचसोबत कॅनॉल रोडवरील मोठ्या खड्ड्याचे लिकेज दुरूस्‍ती करण्‍याची कार्यवाही जलप्रदाय विभागाच्‍या वतीने सुरू करण्‍यात आली.


आयुक्तांपुढे 11 तक्रारी
आयुक्तांनी प्रभाग फेरी केल्यानंतर शिबिराच्‍या माध्‍यमातून नागरिकांच्‍या तक्रारी स्वीकारल्यात. यावेळी एकूण 11 तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याबाबत नागरिकांनी आयुक्तांनी आश्‍वस्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com