

Kachewani Navegaon Road Accidents
esakal
मुंडीकोटा: काचेवानी ते नवेगाव खुर्द मार्गावर गेल्या तीन वर्षांत तब्बल ८९ अपघातांत ४० जणांचा मृत्यू, तर ४९ जण गंभीर जखमी झाले. एवढी मोठी जीवितहानी होऊनही मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना अद्याप कागदावरच असल्याने हा रस्ता नागरिकांसाठी अक्षरशः ‘मृत्यूचा महामार्ग’ ठरला आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.