
कळमेश्वर : कळमेश्वर शहरातून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे गेटवर उड्डाणपूल उभारण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी सुरू होती. या मागणीसाठी ब्रिजलाल रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या गेल्या ६ दिवसांपासून संघर्षशील आंदोलनाला अखेर यश लाभले आहे.