

Washim News
esakal
कारंजा: तालुक्यात एप्रिलच्या अखेरीस उन्हाने अक्षरशः कहर घातला असून, तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रखर ऊन, गरम वारे आणि वाढती उष्णता यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून, नागरिक घरातच थांबण्यास प्राधान्य देत आहेत. परिणामी दुपारी बाहेर पडणे म्हणजे स्वतःला धोक्यात टाकणे, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.