Washim News: प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री!; कारंजात नगरपरिषदेची भूमिका संशयास्पद; कारवाईची मागणी

Illegal Sale of Restricted Plastic Bags in Karanja: कारंजा शहरातील काही दुकानदारांकडून प्रतिबंधित प्लास्टिक कॅरी बॅगची खुलेआम विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
Washim News

Washim News

esakal

Updated on

कारंजा: शहरातील काही दुकानात प्रतिबंधित प्लास्टिक कॅरी बॅगची खुलेआम विक्री होत असल्याचा, तर बहुतांश छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांकडून सर्रास वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने विशिष्ट जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅगवर स्पष्ट बंदी घातलेली असताना अशा प्रकारे सर्रास विक्री होणे म्हणजे नियमांची उघडपणे पायमल्ली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com