

Washim News
esakal
कारंजा: शहराच्या रस्त्यांवर सध्या एक धक्कादायक वास्तव उघड होत असून, अल्पवयीन मुलांकडून भीक मागण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे, या बालकांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणारे स्वतः त्यांचे पालकच असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर कारंजा शहरात बालहक्कांचा उघडपणे भंग होत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या मुलांमध्ये ‘सोल्यूशन’ (गोंद/रासायनिक द्रव्य) नशा करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.