Washim News: कारंजा तालुक्यात सहा महिन्यात रस्ते पुन्हा खड्डेमय; नागरिकांचे प्रवास धोकादायक; लाखो रुपयांचा खर्च वाया, डागडुगी उखडल्याने रस्त्यांची अवस्था बिकट

Recent Repairs Fail Within Months: कारंजा तालुक्यातील लाडेगाव ते पिंपरी मोडक रस्ता लाखो रुपयांचा खर्च करूनही सहा महिन्यांत खड्डेमय झाला आहे. नागरिकांचे प्रवास धोकादायक झाले असून अपघातांची संख्या वाढत आहे.
Washim News

Washim News

esakal

Updated on

कारंजा: तालुक्यातील लाडेगाव ते पिंपरी मोडक या रस्त्याच्या डागडुगीवर लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही अवघ्या काही महिन्यांतच रस्ता पुन्हा खड्डेमय झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सहा महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या दुरुस्तीचे थर उखडून निघाले असून, रस्त्यावर दगडांचे ढीग साचलेले दिसत आहेत. त्यामुळे डागडुगी की दिखावा? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com