

Washim News
esakal
कारंजा: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेली पाणीपुरवठा योजना नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावरून कारंजा नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकात सध्या कलगीतुरा रंगला आहे. सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये या विषयावर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, सभागृहातील प्रत्यक्ष भूमिका आणि नंतरची सार्वजनिक मते यावरून वाद चिघळला आहे.