

Washim News
esakal
वाशीम: वैशाखातील बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख, दूधासारख्या चांदण्यात न्हालेल्या जंगलात शांततेचा एक वेगळाच स्वर उमटला. आणि त्या शांततेतून सुरू होती वन्यजीवांच्या हालचालींची नोंद. वाशीम आणि अकोला जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात यंदाची मचान प्राणी गणना उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.