केदार जाधव म्हणाला, ग्रामीण भागातील मुले उत्कृष्ट खेळाडू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

तिवसा (जि. अमरावती) : मैदानी खेळामध्ये आजही ग्रामीण भागातील मुले उत्कृष्ट खेळाडू आहेत. प्रत्येक राजकीय व्यक्ती ही चांगली खेळाडू असून खेळातही राजकारणासारखीच रणनीती आखली जाते. मी फार नशीबवान आहे. मला तिवसासारख्या ग्रामीण भागात यायला मिळाले. मी सदैव ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी तयार आहे. त्यासाठी मला हाक मारा, असे प्रतिपादन भारतीय संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी केले.
शनिवारी (ता. सात) दुपारी तिवसा येथील सुरवाडी परिसरात तालुका क्रीडासंकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून मोझरी विकास आराखड्यांतर्गत 5 कोटींच्या निधीतून हे क्रीडासंकुल साकारण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरएसडीच्या कोषाध्यक्ष नीता अढाऊ होत्या. स्वागताध्यक्ष कॉंग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नवनीत राणा, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, जयंत देशमुख, नगराध्यक्ष वैभव वानखडे, रोमी भिंडर, एसडीओ रमेश फुलझेले, तहसीलदार रवी महाले उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kedar Jadhav said, “Children from rural areas are excellent players