
उत्तराखंडमधील केदारनाथ धामला भेट देण्यासाठी गेलेल्या यवतमाळच्या जैस्वाल कुटुंबावर मोठी आपत्ती कोसळली. रविवारी (12 जून 2025) सकाळी केदारनाथ मार्गावर झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील राजकुमार जैस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जैस्वाल आणि त्यांची दोन वर्षांची चिमुरडी काशी जैस्वाल यांच्यासह एकूण सात जणांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वणी परिसरात शोककळा पसरली आहे.