

Washim Road
esakal
केनवड: पिंपरी सरहद्द येथे पुलगाव-जालना राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उकीरड्याला रविवारी (ता. २९) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघून संपूर्ण गावात पसरल्याने ग्रामस्थांना श्वास घेण्यास त्रास सहन करावा लागला. तसेच महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनाही दृष्य अस्पष्ट झाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.