

Vidarbha
esakal
अर्जुनी मोरगाव: तालुक्यातील केशोरी येथे उपटपाल कार्यालयाकरिता मंजुरी मिळाली असतानादेखील हे कार्यालय सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी हे कार्यालय सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे) चेतन दहीकर यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.