नागपूर विद्यापीठात ना प्र-कुलगुरू ना अधिष्ठाता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rtmnu

डॉ. सिद्धार्थ विनायक काणे ८ एप्रिलला निवृत्ती झाल्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे आणि चारही अधिष्ठात्यांचा कार्यकाळ संपला. ८ ऑगस्टला नव्या कुलगुरूंनी पदाची सूत्रे स्वीकारली. आता नव्या प्र-कुलगुरू पदासाठी प्रस्ताव पाठविणे आणि अधिष्ठात्यांची नेमणूक करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. मात्र, त्याबाबत निर्णय झाला नाही.

नागपूर विद्यापीठात ना प्र-कुलगुरू ना अधिष्ठाता!

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाता ही पदे एक महिन्यापासून रिक्त असल्याने परीक्षा कशी घ्यायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. निकाल घोषित करण्यासाठी अधिष्ठात्यांची समिती असते. मात्र, सध्या प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाता ही दोन्ही पदे रिक्त असल्याने अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

डॉ. सिद्धार्थ विनायक काणे ८ एप्रिलला निवृत्ती झाल्यानंतर प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे आणि चारही अधिष्ठात्यांचा कार्यकाळ संपला. ८ ऑगस्टला नव्या कुलगुरूंनी पदाची सूत्रे स्वीकारली. आता नव्या प्र-कुलगुरू पदासाठी प्रस्ताव पाठविणे आणि अधिष्ठात्यांची नेमणूक करण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. मात्र, त्याबाबत निर्णय झाला नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे ठरले आहे. दुसरीकडे विद्यापीठाच्या विविध सत्रांचे निकाल रखडले आहेत.

निकाल लावताना त्यात झालेल्या चुका आणि आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्र-कुलगरूच्या अध्यक्षतेखालील चार अधिष्ठात्यांचा समावेश असलेली समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

तसेच ‘बोर्ड ऑफ डीन्स'द्वारे अभ्यासक्रम तयार करणे, पेपर सेट करणे आणि इतर कामे केली जातात. सध्या एकाही अधिष्ठात्याची नेमणूक झालेली नसल्याने अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमाचे पेपर कसे तयार करायचे हा मोठा प्रश्न आहे. याशिवाय निकाल लावण्याची कामे खोळंबली आहेत.
परीक्षेच्या सर्व समित्यांचे अध्यक्ष प्र-कुलगुरू असतात. आता हेच पद रिक्त आहे. यासाठी विद्यापीठाची तयारी पूर्ण असली तरी, सध्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. परीक्षा घेण्याच्यादृष्टीने परीक्षा मंडळ आणि विद्वत परिषदेची बैठक घेणे आवश्यक आहे.

सविस्तर वाचा - चार पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू! राज्यात आजवर १६९ पोलिसांचा गेला बळी

एकही जाहिरात नाही
विद्यापीठ कायद्यानुसार पूर्णवेळ अधिष्ठात्यांची निवड करण्यासाठी जाहिरात आवश्यक असते. या प्रक्रियेतून अर्ज आल्यानंतर त्यापैकी शाखानिहाय अधिष्ठात्यांची निवड करण्यात येते. मात्र, विद्यापीठाने एकदाही या पदाच्या निवडीसाठी जाहिरात दिलेली नाही. केवळ कुलगुरू यांच्याद्वारेच निवड करण्यात आली आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top