esakal | खांबोरा पाणीपुरवठा योजनेला लागली गळती
sakal

बोलून बातमी शोधा

canal leakeg

अकोट व अकोला तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील ६४ गावांना पाणी पुरवणाऱ्या खांबोरा योजनेला गळती लागली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट जाणवत आहे. काटेपूर्णा नदीवरील खांबोरा येथील उन्नई बंधाऱ्यातून या योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. या बंधाऱ्याच्या कॅनॉलचे गेट नादुरुस्त असल्यामुळे पाणी वाया जात आहे.

खांबोरा पाणीपुरवठा योजनेला लागली गळती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोट व अकोला तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील ६४ गावांना पाणी पुरवणाऱ्या खांबोरा योजनेला गळती लागली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट जाणवत आहे. काटेपूर्णा नदीवरील खांबोरा येथील उन्नई बंधाऱ्यातून या योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. या बंधाऱ्याच्या कॅनॉलचे गेट नादुरुस्त असल्यामुळे पाणी वाया जात असून, ते त्वरित दुरुस्त करण्यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकारीयांना पत्र दिले आहे.


कोरोना विषाणू महामारीच्या काळामध्ये ग्रामीण जनतेला मूलभूत सुविधा नियमित मिळणे आवश्‍यकआहे. त्यांना त्रास होता कामा नये, असे शासनाचे निर्देश आहे. असे असतानाही केवळ गेट नादुरुस्त असल्याने खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या 64 गावांवर पाणीटंचाईचे सावट आहे. पाणी उपलब्ध असतानाही ही कृत्रिम पाणीटंचाई अनेक दिवसापासून तक्रारी केल्यानंतरही दुर्लत्रित आहे. पाटबंधारे विभाग या बाबीकडे सतत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार सावरकर यांनी केला आहे. पाणी लिकेज थांबविण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करूनही दुरुस्तीचे काम होत नसल्याचे आमदारांनी म्हटले आहे.


तेरा दिवसांचे पाणी तीन दिवसांवर
उन्नई बंधारा पूर्ण भरल्यानंतर सुमारे दहा ते 13 दिवस पाणी पुरते; परंतु लिकेज प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने 3-4 दिवसांत पाणी संपून जात आहे. पाणी संपल्यानंतर परत काटेपूर्णा धरणातून खांबोरा बंधाऱ्यासाठी पाणी सोडावे लागते. ही परीस्थिती लिकेजमुळे पाणी वाया जात असल्यामुळे उद्भवते. काटेपूर्णा धरणाचे पाणी कमी झाल्यास खारपाणपट्ट्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनावर या उन्हाळ्याच्या काळात भटकंती करावी लागण्याची वेळ उद्‍भवू शकते.


मानवी संवेदना हरवल्या.
पाणी वाया जात असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर पाटबंधारे विभागाने लक्ष केंद्रित करावे तसेच जिल्हा परिषदने दुरुस्तीची मागणी केल्यावर जलसंपदा विभागाने प्राप्त परीस्थितीत पाणीपट्टीची मागणी करत अडवणुकीचे धोरण स्वीकारू नये. मानवी संवेदना नसल्याचा हा प्रकार आहे. एकीकडे केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्यांना प्रत्येक बाबींमध्ये दिलासा व सवलत देण्याचं काम करत असताना असा असमर्थनिय प्रकार सहन करण्यापलीकडे आहे, असे आमदार सावरकर यांनी म्हणाले. त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना याबाबत त्वरित दक्षता घेऊन तातडीने कार्यकारी अभियंता यांना सूचना देऊन गेट दुरुस्ती करण्याची मागणी केली. 

loading image