बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

खामगाव : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणुसकीचे जीवन जगण्यासाठी तथागत गौतम बुद्धांचा विज्ञानवादी बौद्धधम्म दिला. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता मात्र त्यांच्या महापरिनिर्वानानंतर ही जबाबदारी समाजातील प्रत्येकावर आली आहे. तेव्हा आपसातील हेवेदावे, राग मोह माया, मत्सर ,स्वार्थ बाजूला सारून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत बौद्धमय करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन भदंत ज्ञानज्योती स्थविर तपोवन बुद्धविहार संघरामगिरी चंद्रपूर यांनी केले.

खामगाव : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणुसकीचे जीवन जगण्यासाठी तथागत गौतम बुद्धांचा विज्ञानवादी बौद्धधम्म दिला. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता मात्र त्यांच्या महापरिनिर्वानानंतर ही जबाबदारी समाजातील प्रत्येकावर आली आहे. तेव्हा आपसातील हेवेदावे, राग मोह माया, मत्सर ,स्वार्थ बाजूला सारून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत बौद्धमय करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन भदंत ज्ञानज्योती स्थविर तपोवन बुद्धविहार संघरामगिरी चंद्रपूर यांनी केले.

खामगाव  तालुक्यातील बोथाकाजी येथे  पूज्य भदंत ज्ञानज्योती सेवासंघ, भीमशक्ती क्रीडा मंडळ व उपासक उपासिका यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 7 व 8 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय भव्य सधम्म देसना समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सधम्म देसना समारंभाचे उद्घाटक म्हणून पूज्य भदंत ज्ञानज्योती स्थविर  तपोवन बुद्धविहार संघारामगिरी जी. चंद्रपूर होते तर धम्मपिठावर  अध्यक्ष भदंत विनयपाल शेगाव,भदंत धम्मरक्षित नागपूर, भदंत स्वरानंद बुलडाणा,भदंत नागज्योती, भदंत बुद्धपुत्र गोमेधर, भदंत श्रद्धानंद,भदंत तन्हंकर यांच्यासह भिख्खू संघाची उपस्थिती होती.  यावेळी भदंत ज्ञानज्योती यांनी मानवी जीवन जगत असताना तथागत गौतम बुद्धांच्या शांततामय मार्गाची गरज आहे.

माणूस ऐकीव ज्ञानाने नव्हे तर मन परिवर्तनाने जीवनात आमुलाग्र बदल घडवू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या शिक्षणाच्या  मार्गाने समाजात बदल झाला आहे. त्यामुळे संसारात गुरफटून न राहता धम्माचे आचरण करून धम्म वाढविण्यासाठी प्रत्येकाशी प्रेमाने बोला. दुःखाचा नायनाट करण्यासाठी विपश्यना करा. भगवान बुद्धांनी दिलेल्या पंचशीलेचे पालन केल्यास जीवन धन्य होते. दुसऱ्याकडे वाईट नजरेने न पाहता सर्वांशी मैत्री करून बौद्ध धम्म वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहा असे भदंत ज्ञानज्योती  यांनी सांगितले. 7 फेब्रुवारीला धम्मध्वजारोहण, शिलग्रह करण्यात आले. तर  संध्याकाळी माता रमाई जयंतीनिमित्त  भदंत ज्ञानज्योती,भदंत विनायपाल यांच्या उपस्थितीत गावातून धम्मरॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो उपासक, उपासिका सहभागी झाले होते.रात्री भीम बुद्ध गितगायनाचा कार्यक्रम पार पडला. तर 8 फेब्रुवारीला ध्यानसाधना, मंगलमैत्री, भन्तेजींची धम्मदेशना, सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान दिलेल्या धम्मबांधवांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश हिवराळे तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळापूर चे आमदार बळीराम सिरस्कार, व्ही. पी. दांडगे, व्ही एम भोजने, संघपाल जाधव, नितीन सूर्यवंशी, डॉ. अनिल वानखडे,आणिताताई डोंगरे यांची उपस्थिती होती.तसेच  पुणे येथील प्रियंका तुपे व राहुल सुरवाडे यांचे  व्याख्यान झाले.  यावेळी अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील हजारो  उपासक उपासिका यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोथाकाजी येथील भीमशक्ती क्रीडा मंडळ व महिला उपासिका संघाने परिश्रम घेतले.

व्यसनाचे दान करा
बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. त्यामुळे समाजाची प्रगती झाली. मात्र या बदलासोबत समाजात व्यसनाचे प्रमाण फारसे कमी झाले नाही. तेव्हा या सधम्म देसना समारंभात उपस्थित व्यसन करणाऱ्या उपासक उपासिका यांनी  पैशाचे नव्हे तर सर्व प्रकारच्या व्यसनाचे दान करावे असे भावपूर्ण आवाहन भदंत विनयपाल यांनी केले. यावेळी उपस्थितांनी व्यसनाचा त्याग करण्याची संमती दिली.

Web Title: khamgao lecture by budhhavihar sangharamgiri