Electric Shock: विद्युत धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; खामगाव शेतशिवारातील घटना
Khamgaon Farmer: खामगाव तालुक्यातील चितोडा शेतशिवारात बेकायदेशीर वायरिंगमुळे शेतकऱ्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. म्हैस वाचवण्याच्या प्रयत्नात घडलेल्या या दुर्घटनेने ग्रामीण विद्युत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.
खामगाव : चितोडा शेतशिवारात चिखलात अडकलेल्या म्हशीला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ता. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.