

Khamgaon Illegal Activities
esakal
खामगाव: शहर व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात ‘दिखाऊ’ कारवाईचा खेळ पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘दैनिक सकाळ’ मध्ये बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा पोलीस प्रशासनाला खडबडून जाग आली आणि स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) एमआसडीसी भागात एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली खरी, पण ही कारवाई केवळ ‘धूळफेक’ ठरल्याचे २४ तासांतच स्पष्ट झाले आहे. दुसऱ्याच दिवशी हे सर्व बेकायदेशीर धंदे पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने सुरू झाल्याने पोलिसांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.