

Buldhana News
esakal
बुलडाणा: जिल्ह्या प्रशासन आणि कृषी विभाग २०२६-२७ साठीच्या खरीप हंगामासाठी तयारीला लागले असून यंदा जिल्ह्यात ७ लाख ३९ हजार ७८० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४ लाख ३५ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन, १ लाख २८ हजार २२० हेक्टरवर कापूस, ९९ हजार ५०० हेक्टरवर तूर तर ६३ हजार हेक्टरवर मक्याची लागवड होणार आहे.