Buldhana News: तहसीलदारावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न; रेतीमाफियांची मुजोरी वाढली; सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले वाहन

Attempted Attack on Revenue Officer: खामगावात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या माफियांनी तहसीलदारांवर टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार सुनील पाटील यांनी “सिनेस्टाईल” पाठलाग करून वाहन चालकाला पकडले व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

खामगाव: खामगावात अवैध वाळू माफियांनी थेट प्रशासनालाच आव्हान दिल्याची धक्कादायक घटना सोमवार ता. ३० मार्च रोजी घडली. तालुक्यातील पारखेड शिवारात अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाहन घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न रेतीमाफियांनी केला. मात्र, डगमगून न जाता तहसीलदारांनी ''सिनेस्टाईल'' पाठलाग करून मुजोर वाहनचालकाला पकडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com