Shegaon Crime
Shegaon Crimesakal

Shegaon Crime : ३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; पोलिसांनी चार तासात आरोपीस केली अटक

Shegaon kidnapping : शेगाव येथे झोपेतून ३ वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी केवळ ४ तासांत आरोपीला पकडून मुलीची सुखरूप सुटका केली.
Published on

शेगाव : शहरात एका ठिकाणी रात्री झोपलेल्या दांपत्याजवळील त्यांच्या ३ वर्षाचे अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना ता.३१ मे रोजी रात्री घडली. दरम्यान पोलिसांनी स्थानिक नागरिक, सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे सदर अपहरणकर्त्यां युवकाचा शोध घेऊन चार तासाचे आत त्याला अटक करत अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com