दोन अल्पवयीन मुलांसह मुलीचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

अमरावती : ग्रामीण भागातील दोन अल्पवयीन मुलांसह एका मुलीची अपहरणाची घटना उघडकीस आली. मोर्शी व शेंदूरजनाघाट ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.
मोर्शी परिसरातील इयत्ता बारावीत शिकणारी दोन अल्पवयीन मुले दोन दिवसांपूर्वी शनिवारी (ता. सात) घराबाहेर पडली. ते दोघेही परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. काही पत्ता लागत नसल्याचे बघून दोन्ही मुलांच्या पालकांनी मोर्शी ठाण्यात तक्रार केली.

प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अन्य दुसऱ्या घटनेत शेंदूरजनाघाट ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील शालेय विद्यार्थिनी मैत्रिणीसोबत शाळेत जाण्यासाठी 18 ऑगस्ट रोजी घराबाहेर पडली. तिचा अद्याप शोध लागला नाही. पालकांच्या तक्रारीवरून शेंदूरजनाघाट पोलिसांनी संशयित आकाश वटके (वय 25) विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. कारण अल्पवयीन मुलीसोबतच संशयित आकाशसुद्धा गावातून बेपत्ता असल्याने त्यानेच मुलीचे अपहरण केल्याचा आरोप अपहृत मुलीच्या पालकांनी तक्रारीतून केला.
एकतर्फी प्रेमप्रकरणातून छेडखानी
पथ्रोट परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा (वय 16) काही दिवसांपासून संशयित मुजाहीद खॉ फिरोज खॉं पठाण (वय 19) युवक पाठलाग करीत होता. त्याने दोन दिवसांपूर्वी पीडित मुलीला रस्त्यात अडवून तिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने पथ्रोट पोलिसात तक्रार केल्याने मुजाहीद खॉ विरुद्ध गुन्हा दाखल झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kidnapping of a girl with two minors boy

टॅग्स