Amravati Crime: महिलेची गळा आवळून हत्या; कपड्याने हातपाय होते बांधलेले
Crime News: शिरसगाव ब्रिजखाली साडीने हातपाय बांधून व गळा आवळलेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून फेकल्याचा संशय आहे.
शिरसगावकसबा (जि. अमरावती) : गळा आवळून हत्या केल्यानंतर कपड्याने हातपाय बांधून ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. गुरुवारी (ता. १०) ही घटना उघडकीस आली.