
अमरावती : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तीन महिन्यांमध्ये चौथ्यांदा अमरावती जिल्ह्याचा दौरा केला. गुरुवारी (ता. सहा) त्यांनी गाडगेनगर पोलिसांची भेट घेऊन गुन्ह्याशी संबंधित ४६८ पानांचे दस्तऐवज पोलिसांना सोपविले. दरम्यान, श्री. सोमय्या यांनी आज अचलपूरच्या तहसील कार्यालयाला भेट दिली.