दारूकरिता पैसे न दिल्याने मित्रावर जीवघेणा हल्ला

Knief Attack
Knief Attack
Updated on

नागपूर - दारू पिण्याकरिता पैसे न दिल्याने दोघांनी मिळून एका मित्रावर चाकूने हल्ला करून जीव घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना वाडी पोलिस ठाण्याअंतर्गत कंटोल वाडी परिसरातील एका प्राथमिक शाळेसमोर रविवारी संध्याकाळी ५.४५ वाजता घडली. 

साजन अमित तागडे (२३) आणि स्वप्नील जवंजाळ (२३) दोन्ही रा. त्रिशरण चौक, कंटोल वाडी अशी आरोपींची नावे आहेत. प्रशांत अरुण सेलेकर (२४) रा. रमाबाई चौक, वाडी असे जखमीचे नाव आहे. तिघेही मित्र असून रविवारी संध्याकाळी ते परिसरातील प्राथमिक शाळेजवळ भेटले. त्यावेळी आरोपींनी प्रशांतकडे दारू पिण्याकरिता पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिला असून त्यांच्यात वाद झाला व आरोपींनी संगनमत करून चाकूने त्याच्या गळ्यावर व पोटावर वार करून जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी पळून गेले. प्रशांतला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपी साजन याच्याविरुद्ध यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com