व्यापाऱ्यावर चाकूचे सपासप वार; प्रकृती चिंचाजनक

किराणा दुकानाची वसुली करून परत येत असलेल्या महागाव येथील किराणा व्यापाऱ्यावर खडका येथे राष्ट्रीय महामार्गावरील फ्लायओव्हर वर अज्ञात दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केला.
Passion pro
Passion proSakal
Summary

किराणा दुकानाची वसुली करून परत येत असलेल्या महागाव येथील किराणा व्यापाऱ्यावर खडका येथे राष्ट्रीय महामार्गावरील फ्लायओव्हर वर अज्ञात दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केला.

महागाव (जि. यवतमाळ) - किराणा दुकानाची वसुली करून परत येत असलेल्या महागाव येथील किराणा व्यापाऱ्यावर खडका येथे राष्ट्रीय महामार्गावरील फ्लायओव्हर वर अज्ञात दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. आज बुधवारी ४ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना घडली. अनिल गंभीरमल शर्मा असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. महागाव येथे ते ठोक व किरकोळ किराणा व्यापार करतात. धनोडा आणि मराठवाड्यातील वाई बाजार पर्यंत ग्रामीण भागातील किराणा व्यापाऱ्यांना ते माल पुरवतात.

किराणा मालाच्या रकमेची वसुली करण्यासाठी अनिल शर्मा वाईबाजार येथे गेले होते. शाईन पॅशन प्रो या मोटरसायकलने ( क्र. एम.एच.२९ एव्ही ६०७३) परत येताना खडका येथील फ्लायओव्हर वर अज्ञात लुटारूंनी पाळत ठेवून त्यांची मोटरसायकल अडवली. बॅग हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या लुटारूंचा शर्मा यांनी प्रतिकार केला. मात्र, त्यांच्या दोन्ही हातावर चाकूचे गंभीर वार करून लुटारूंनी रकमेची बॅग जबरदस्तीने हिसकावली व पलायन केले. रोड रॉबरीच्या या घटनेत व्यापारी अनिल शर्मा हे गंभीर जखमी झाले.

हाताची नस कापल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व रोडवर रक्ताचे थारोळे साचले. दरम्यान काही वाहनधारकांनी जखमी व्यापाऱ्यास महागाव येथे आणले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने पुसद येथे भरती करण्यात आले आहे. बॅगमध्ये वसुलीची लाखो रुपये रक्कम असल्याचे कळते. यापुर्वी फुलसावंगी मार्गावर चिल्ली येथे रोड रॉबरीची घटना घडली.

त्याआधी खडका येथील दत्त पेट्रोल पंपावर दोन दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर पैशाची बॅग हिसकावून पळ काढला होता. शिवाय याच मार्गावर आंबोड्या नजीक महागाव येथील एका सुवर्णकारास दिवसा ढवळ्या लुटण्यात आले होते. ह्या घटना ताज्याच असताना आज पुन्हा एका व्यापाऱ्यास वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावर शस्त्राचे वार करून लुटण्यात आल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com