esakal | वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावात हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये काय आहे बेड्सची स्थिती; जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी 
sakal

बोलून बातमी शोधा

corona in vidarbha

सामान्य नागरिकांवर कोणताही परिणाम होत असल्याचे दिसून येत नाही आहे. म्हणूनच ते बिनधास्त वावरत असल्याचे दिसत आहे. नागरिकांचा हाच निष्काळजीपणा त्यांना चांगलाच भोवणार असल्याचे दिसून येत आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावात हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये काय आहे बेड्सची स्थिती; जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : विदर्भात कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे. रोज होणारी वाढ डोकेदुखी ठरत आहे. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना निष्फळ ठरत असल्याचे दिसून येते. यातही नागपूर, यवतमाळ आणि अमरावतीची स्थिती खूपच भयानक आहे. रोजच्या रुग्णांची वाढ चांगलीच चिंता वाढवत आहे. मात्र, याचा सामान्य नागरिकांवर कोणताही परिणाम होत असल्याचे दिसून येत नाही आहे. म्हणूनच ते बिनधास्त वावरत असल्याचे दिसत आहे. नागरिकांचा हाच निष्काळजीपणा त्यांना चांगलाच भोवणार असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - हाहाकार! उपराजधानीत आठवडाभरात १२ हजार नव्या कोरोनाबाधितांची भर; आज नवे २ हजार २५२ रुग्ण 

जिल्हानिहाय कोरोनाची स्थिती 

नागपूर जिल्हा 

नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा कहर दिसून येत आहे.  जिल्ह्यात वर्ष २०२०- २०२१ या वर्षात कोरोनामुळे एकूण ४,७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२१ च्या सुरुवातीच्या ३ महिन्यांमध्ये आतापर्यंत एकूण १७ हजार ५०६ जण ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तब्बल १ लाख ५० हजार ८२२ जणांवर उपचार केल्यावर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या सध्या १२ हजार ७२८ आहे,  जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी तब्बल ४ हजार ६५० बेड्स असून त्यातील २ हजार ४८१ बेड रिकामे आहेत. 

अमरावती जिल्हा

अमरावती जिल्ह्यात वर्षभरात कोरोनामुळे एकूण ५९९ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ४२ हजार ४९७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तब्बल ३७ हजार १२३ जणांवर उपचार केल्यावर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमरावती शहरात गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या सध्या ८ हजार ५८२ आहे, तर ग्रामीण भागातील ४ हजार ३४८ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील ४६ रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी तब्बल ३ हजार ११४ बेड्स असून त्यातील एक हजार २० बेडवर सध्या रुग्ण आहेत. तर २ हजार ९४ बेड रिकामे आहेत.

यवतमाळ जिल्हा

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला वाढलेल्या कोरोना बधितांच्या आलेख मार्च महिन्यातही वाढतच चालला आहे. सरासरी दिवसाला तीनशे पॉझिटिव्ह अहवाल येत आहे. वर्षभरात पाचशे कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात २ हजार ७३६ ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१ हजार ७३५ झाली आहे. जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १८ हजार ४९३ झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ५०६ जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

हेही वाचा - गृहिणींनो, तळणाचे पदार्थ करताना हात आवरा; तेलाचे भाव भिडले गगनाला; लिटरमागे इतकी वाढ 

कोरोनाबधितांचा आकडा फुगत असल्याने बंद करण्यात आलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सुपरस्पेशालिटी कोविड हॉस्पिटल रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्ष पुन्हा सुरू करण्यात आला आहे.