आता हे काय! आरक्षण सोडतीत पात्र उमेदवार निवडून येऊनही सरपंचपद रिक्तच

शरद केदार
Saturday, 13 February 2021

तालुक्‍यात 10 गावांच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड आज झाली. त्यामध्ये कुरणखेड ग्रामपंचायतीमध्ये फक्त उपसरपंच्यांचीच निवड करण्यात आली. यामध्ये उपसरपंच म्हणून मोहित दिलीपराव देशमुख निवडून आले.

चांदुर बाजार (जि. अमरावती) : तालुक्‍यातील 10 ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये कुरणखेड ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद नामाप्र महिलांसाठी राखीव झाले होते. ग्रामपंचायतीमध्ये पात्र उमेदवार निवडून आला असतानाही सरपंच निवडणुकीत आपली उमेदवारी दाखल न केल्याने तेथील सरपंचपद रिक्त राहिले. 

हेही वाचा - कोरोनाचा धोका वाढतोय! बाधितांच्या संपर्कात आल्यास करा चाचणी, अन्यथा संपूर्ण सोसायटी विलगीकरणात

तालुक्‍यात 10 गावांच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड आज झाली. त्यामध्ये कुरणखेड ग्रामपंचायतीमध्ये फक्त उपसरपंच्यांचीच निवड करण्यात आली. यामध्ये उपसरपंच म्हणून मोहित दिलीपराव देशमुख निवडून आले. सरपंचपद रिक्त आहे. नानोरीच्या सरपंचपदी पल्लवी सचिनराव मस्के, उपसरपंचपदी मदन सुभाषराव राऊत, विरूळपुर्णाच्या सरपंचपदी राजकन्या राजेंद्र तायडे, उपसरपंचपदी ऋषिकेश बाळासाहेब वैद्य, कृष्णापुरच्या सरपंचपदी  रूपाली नीतेश रेखे, उपसरपंचपदी चंदा सुभाष तंतरपाळे यांची निवड झाली. विषरोलीच्या सरपंचपदी मनीषा राहुल इंगळे, तर  उपसरपंचपदी दुर्गा शंकर दहेकर विजयी झाल्या. वणीच्या सरपंचपदी आरती राऊत, तर उपसरपंचपदी अशोक अलोणे, निमखेडच्या सरपंचपदी प्रल्हाद पारनू शिरसाठ, तर उपसरपंचपदी जलेलू रहमान जियाउर रहमान विजयी झाले. 

हेही वाचा - रेडिओच्या शोधाचा वाद अन् जगातील पहिले रेडिओ केंद्र माहितीये का?

जालनापूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नीलकंठ सूर्यभान चौहान, तर उपसरपंचपदी आशिष विजय काळे विजयी झाले. आसेगावच्या सरपंचपदी कांचन उमेश रघुवंशी, तर उपसरपंचपदी सुधीर गोविंद वाटणे निवडून आले. सोनोरीच्या सरपंचपदी श्रद्धा पंकज बोराळे, तर उपसरपंचपदी रोहिदास हरीचंद्र गाजबिये निवडून आले. या 10 गावात सरपंच व उपसरपंच पदाची निवड शांततेत झाली आहे. 

सदर निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार धिरज स्थूल व नायब तहसीलदार अर्जुन वांदे यांनी निडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अध्यासी अधिकारी यांची निवड केली होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kurankhed sarpanch post vacant even eligible candidate selected chandurbazar of amravati