कामकर्त्यांची राजकारण्यांना कदर नाही :माधुरी मडावी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

नरखेड (जि.नागपूर)  तत्कालीन मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची बिनधास्त कार्यशैली सर्वत्र परिचित आहे. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचा नरखेड नागरिक सत्कार समितीच्या वतीने श्रीसंत सावता मंगल कार्यालयात शाल, श्रीफळ व मानपत्र बहाल करून सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अभिजित गुप्ता, प्रमुख पाहुणे म्हणून पीरिपा नेते जयदीप कवाडे, पालिका स्वच्छतादूत दीपक ढोमणे, जब्बार काझी व संबंधित नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. 

सत्कारसमयी मात्र सत्कारमूर्ती माधुरी मडावी भावनाविवश होऊन ओक्‍साबोक्‍सी रडल्या. कामकर्त्यांची राजकारण्यांना मात्र कदरच नाही. माझ्या नावानिशी "माधुरी ही तलवार दुधारी' लिहिणाऱ्या पत्रकारांचाही उल्लेख करायला त्या विसरल्या नाहीत. शिवाय पालिका उपाध्यक्ष अजय बालपांडे यांच्यावर ताशेरे ओढल्याशिवाय मात्र त्या चुकल्या नाहीत. 
अध्यक्षीय भाषणातून नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी गावातून गेलेली डुकरे परत आल्याचा उल्लेख करून त्यांचा तोल सुटल्याचा सूर सर्वत्र निघत होता. प्रास्ताविक सुनील बालपांडे, संचालन रत्नाकर मडके यांनी केले. आभार रमेश रेवतकर यांनी मानले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labor politicians do not appreciate: Madhuri Madavi