
उल्हास मेश्राम
साळवा, (ता.कुही) : ‘रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटकाबाहेर कधी फाटका आत आहे’, अशी व्यथा असलेल्या कामगारांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांकडे जातीने लक्ष देऊन त्यांच्या उद्धाराचा खऱ्या अर्थाने विचार झाला तरच ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील, अन्यथा पिढ्यान पिढ्यांपासून त्यांचा फक्त आणि फक्त वापर होत राहणार, असे स्पष्ट आणि परखड मत कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळचे हमाल-मापारीवर्गाचे संचालक सुधीर लुचे यांनी व्यक्त केले.