
नागपूर : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगरातील भारतीय लष्करी दलाच्या आयुध निर्माणी प्रकल्पात झालेल्या भीषण स्फोटात आठ कर्मचारी दगावले. या दुर्घटनेने आयुध निर्माणी प्रकल्पांचा अस्वस्थ शेजार लाभलेल्या विदर्भातल्या लाखो कामगारांसाठी अत्यावश्यक असलेल्या अद्ययावत बर्न वॉशिंग युनिटचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.