आमरावती - उमरी अरबच्या ग्रामस्थांचे घसे काेरडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मूर्तिजापूर : तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. उमरी अरब येथे गेल्या 15 दिवसापासून जीवन प्राधीकरण विभागाने गावाला पाणीपुरवठा केलेला नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरण विभागाला निवेदन दिले आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील कारंजा मार्गावरील उमरी अरब गावाला महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाच्या वतीने पाणीपुरवठा केला जाताे. सध्या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाःकार माजला आहे. नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. गेल्या 15 दिवसांपासून भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाप्रती तीव्र राेष व्यक्त करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी उमरी अरब ग्रामपंचायतच्या वतीने ठराव घेऊन जीवन प्राधिकरण मूर्तिजापूर यांना मागणीचे निवेदन सादर केले. निवेदनावर सामाजीक कार्यकर्ते शकील चाकस, अन्सार चाकस, साेहेल चाकस, विजय मुळे, कलाम चाकस यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

उमरी अरब येथे पाणीपुरवठा करण्यात काेणती अडचण निर्माण हाेत आहे याची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल.
- एम.आर.बाेबडे, उपविभागीय अभियंता, जीवन प्राधिकरण, मूर्तिजापूर

Web Title: lack of water in umari arab village in aamravati