.Ladkhed Crime, Woman Dies, Sword Attack
ESakal
लाडखेड : प्रेमप्रकरणातून प्रेयसी तसेच तिच्या आईवर तलवारीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात आई कांता सहदेव तेलंगे (वय ४८) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर सोनू सरकटे (वय ३०) ही गंभीर जखमी झाली. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना लाडखेडच्या इंदिरानगरात गुरुवारी (ता. १) रात्री दहाच्या सुमारास घडली.