विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावणारा "दिनकर'

नितीन कुरई
मंगळवार, 15 मे 2018

बुटीबोरी (नागपूर) : आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक स्पर्धा लागली आहे. आपले स्थान निर्माण झाले असून अभ्यासाच्या जिद्दीने प्रत्येकच जण भारावला आहे. या स्पर्धेत गरीब विद्यार्थी मागे पडू नयेत यासाठी बुटीबोरी येथे युवराज दिनकर मेश्राम यांनी वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. येथे विद्यार्थ्यांना नि:शुल्क शेकडो पुस्तके अभ्यासासाठी मिळतात.

बुटीबोरी (नागपूर) : आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक स्पर्धा लागली आहे. आपले स्थान निर्माण झाले असून अभ्यासाच्या जिद्दीने प्रत्येकच जण भारावला आहे. या स्पर्धेत गरीब विद्यार्थी मागे पडू नयेत यासाठी बुटीबोरी येथे युवराज दिनकर मेश्राम यांनी वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. येथे विद्यार्थ्यांना नि:शुल्क शेकडो पुस्तके अभ्यासासाठी मिळतात.
कामगारांची वस्ती असलेल्या बुटीबोरी मध्ये सामाजिक जाण ठेऊन गरिबांना शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी युवराज दिनकर मेश्राम यांनी 14 एप्रिल 2015 रोजी बुटीबोरी येथील सिडको कॉलनीमध्ये वडिलांच्या नावाने "दिनकर स्टडी सेंटर'ची स्थापना केली. केवळ दोन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या वाचनालयात सध्या दीडशेहून अधिक विद्यार्थी अभ्यास करतात. गरजू, होतकरू, अभ्यासाची जिद्द असणारी व गरीब विद्यार्थ्यांना येथे कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. वाचनालय विनामूल्य असले तरी शिस्त आणि नियम या तत्त्वावर आधारित आहे. वाचनालयात 500 ते 600 पुस्तके आहेत. यात एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी., बॅंकिंग, संपूर्ण स्पर्धा परीक्षा, साहित्यिक, पौराणिक, थोर विचारवंत, समाजसुधारक, चालू घडामोडी आदींचा समावेश आहे. यासोबतच दैनिके, मासिक, विद्यार्थ्यांकरिता इंटरनेट सुविधा, उद्‌बोधन कक्ष पुरविल्या जातात.
बाहेरगावाच्या विद्यार्थ्यांचा विचार
दिनकर स्टडी सेंटर दोन बॅचमध्ये चालविले जाते. सकाळी 8 वाजतापासून बाहेरगावातील मुला-मुलींनासुद्धा प्रवेश देण्यात येतो. तर सायंकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत हे वाचनालय स्थानिक विद्यार्थ्यांकरिता सुरू असते. प्रत्येक विद्यार्थी या वाचनालयाची देखरेख व स्वच्छता स्वत: करतो. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्याकरिता तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व मुलाखतीला सामोरे जाण्याची तयारीसुद्धा या वाचनालयात विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. वाचनालयातून अभ्यास करणारे नितीन नागपुरे, योगेश येवले, मन्नू परिहार, दुर्वास रेवतकर, विशाल ढेरकर, माधुरी वाघमारे व प्रफुल्ल कोकाटे यांनी शासकीय नोकरीत संधी मिळाली आहे.
आम्हीही उभारू असेच वाचनालय
नागपूर शहरातील वाचनालयात जाण्याकरिता दररोज प्रवास करणे अवघड होते व वेळेचाही अपव्यय होते. महागडे वाचनालय आर्थिकदृष्ट्‌या परवडण्यासारखे नसल्याने बुटीबोरी येथील दिनकर स्टडी सेंटर आमच्यासाठी महत्त्‌वाचे ठरले. अभ्यासविषयक गरजा पूर्ण होत असल्याने एक प्रश्न सुटलेला आहे. आयुष्यात चांगले करता आले तर असेच वाचनालय स्थापन करण्याचा मानस बुटीबोरी येथील तक्षक पाटील, खैरी येथील सविता शेंदरे, सातगाव येथील शीतल मोहितकर, गुमगाव येथील संगीता नानोरे यांनी व्यक्त केला.

Web Title: Laibrery for poor student