तीन दिवसांत लाखोंची दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

मूल (चंद्रपूर) : तालुक्‍यात ठिकठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. लाखो रुपयांची अवैध दारू ताब्यात घेतली. येथे नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांच्या धाडसत्राने अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

मूल (चंद्रपूर) : तालुक्‍यात ठिकठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. लाखो रुपयांची अवैध दारू ताब्यात घेतली. येथे नव्याने रुजू झालेल्या ठाणेदारांच्या धाडसत्राने अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
मूल येथील चामोर्शी नाक्‍याजवळ नाकाबंदी करून 450 नग देशी दारू आणि एक वाहन असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. यात तीन आरोपींना अटक करण्यात आली. सावली पोलिस ठाण्या अंतर्गत अवैध दारूचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात 71 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. मूल तालुक्‍यातील केळझर येथे हातभट्टीवर काढण्यात येत असलेली अवैध मोहा दारू पकडण्यात आली. यात 85 लिटर मोहा दारू जप्त करण्यात आली. येथून 87 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात केळझर येथील किशोर केशव खोब्रागडे हा पसार झाला. मूलमध्ये पंधरा नग विदेशी दारू जप्त करण्यात आली. यात संतोष बाबूराव कन्नमवार हा पसार आहे. बेंबाळ येथे 45 हजारांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. यात एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींवर अवैध दारू अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मूल पोलिस स्टेशनचा नागपूर ग्रामीणमधून बदली होऊन आलेले सतीशसिंह राजपूत यांनी पदभार स्वीकारला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lakho rupee of liquor seized in three days