गडचिरोलीत येणार रेल्वे; जमीन अधिग्रहणास प्रारंभ

देसाईगंज-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या कामाला सुरुवात झाली
land acquisition for Gadchiroli railway begins
land acquisition for Gadchiroli railway beginssakal

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित देसाईगंज-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. गडचिरोली उपविभागाअंतर्गत येत असलेल्या आठ गावांमधील ४५.७६ हेक्टर आर खासगी जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. लवकरच रजिस्ट्रेशन प्रक्रियेलाही सुरुवात होणार आहे.

देसाईगंज-गडचिरोली या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली आहे. सर्वेक्षणाचे काम आटोपले होते. मात्र निधी नसल्याने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया संथगतीने सुरू होती. आता निधी उपलब्ध झाला असल्याने या प्रक्रियेत गती आली आहे. गडचिरोली उपविभागातील गडचिरोली, मोहझरी पॅच, काटली, साखरी, महादवाडी, गोगाव, अडपल्ली, लांझेडा या गावांमधील ४५.७६ हेक्टर आर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. यातील अडपल्ली, काटली येथील शेतकरी जमीन देण्यास तयार झाले असून २१ फेब्रुवारीपासून त्यांची जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू होत आहे.

यामुळे आता गडचिरोलीत रेल्वे येईल हे जवळपास निश्चित झाले असल्याचे दिसून येत आहे. २०१३ च्या शासकीय कामासाठी जमीन अधिग्रहणाच्या कायद्यानुसार थेट खरेदी व सक्तीचे अधिग्रहण यांचा समावेश आहे. जमीन अधिग्रहणासाठी शेतकऱ्याने कोणताही विरोध दर्शविला नाही तर त्याला शासकीय नियमानुसार १०० टक्के मोबदला दिला जातो. मात्र त्याने जमीन अधिग्रहणास विरोध दर्शविल्यास शासन सक्तीने जमिनीची खरेदी करते. अशावेळी २५ टक्के रक्कम कपात करून पैसे दिले जातात. यामध्ये शेतकऱ्याचा तोटा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध न करता जमीन उपलब्ध करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com